पुण्यात खड्डे बुजविण्याच्या ४१ निविदा रखडल्या; १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून अद्याप कार्यादेश नाही
पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.)शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना त्यांची दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेला मात्र अपेक्षित वेग आलेला नाही. पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांनी अद्याप एकाही ठेकेदाराला खड्डे बुजविण्याच्या कामाचा कार्य
kadde


पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.)शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना त्यांची दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेला मात्र अपेक्षित वेग आलेला नाही. पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांनी अद्याप एकाही ठेकेदाराला खड्डे बुजविण्याच्या कामाचा कार्यादेश दिलेला नसल्याने तब्बल ४१ निविदा रखडल्या आहेत. त्यामुळे शहरातील खड्ड्यांचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. वाहनचालकांना खड्ड्यांमधून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे. मात्र, दुरुस्तीच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याचे चित्र आहे.दरम्यान, पुणे महापालिकेच्या पथ विभागातील निविदा प्रक्रियेच्या संथ कारभारावर यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. १०२ निविदांपैकी केवळ आठ निविदांना गती मिळाल्याचे समोर आले होते. अटी-शर्ती, ठेकेदारांमधील वाद आणि निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे रस्ते दुरुस्तीची कामे रखडत असल्याचे चित्र आहे.शहरात खड्ड्यांचा प्रश्न कायम असताना सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. खड्डे बुजविण्याच्या कामाला तातडीने गती देऊन नागरिकांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande