साखरेच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा - कृषीमंत्री
सोलापूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। साखरेच्या किरकोळ दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. सध्या काही ठिकाणी साखरेचा दर ७० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांन
sugar mill


सोलापूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। साखरेच्या किरकोळ दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. सध्या काही ठिकाणी साखरेचा दर ७० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी साखरेच्या दरवाढीचा शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात फायदा होईल, असे मत व्यक्त केले.निमगाव येथे वावडी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले असताना भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

साखरेचे दर वाढले असले तरी साखर कारखान्यांकडे उपलब्ध साठा आणि त्यांच्या साठवण क्षमतेचा प्रश्नमहत्त्वाचाअसल्याचे त्यांनी सांगितले.बँकांच्याकर्जामुळे साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध नसल्याचे भरणे यांनी नमूद केले. मात्र ज्या कारखान्यांकडे अतिरिक्त साखर साठा आहे, त्यांना वाढलेल्या दराचा फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर या दरवाढीचा काही लाभ शेतकऱ्यांनाही मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील पावसाच्या असमान स्थितीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचेही भरणे यांनी सांगितले. काही भागांत अतिवृष्टी झाली असून काही भागांत अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. धरणांमध्ये पाणी असले तरी कालव्यांची क्षमता मर्यादित असल्याने सर्व भागांना गरजेनुसार पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास साठवण तलाव आणि पाझर तलाव भरतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande