महसूलमंत्री बावनकुळेंची डॉ. योगेश क्षीरसागर यांनी घेतली भेट
बीड, 25 ऑगस्ट, (हिं.स.)। भाजपाचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी बीड तालुक्यातील महसूल कार्यालयांसाठी नवीन इमारती उभाराव्यात, रायमोहा येथील महसूल कार्यालयाची दुरुस्ती करावी, तसेच बीड जिल
चंद्रशेखर बावनकुळे


बीड, 25 ऑगस्ट, (हिं.स.)।

भाजपाचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी बीड तालुक्यातील महसूल कार्यालयांसाठी नवीन इमारती उभाराव्यात, रायमोहा येथील महसूल कार्यालयाची दुरुस्ती करावी, तसेच बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या क्रीडांगणासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, आमेर सिद्दीकी आणि शुभम कातांगळे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande