नांदेड - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना दहीहंडी उत्सवाचे निमंत्रण
नांदेड, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। नांदेड येथील दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी, महानगर नांदेड व भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आशुतोष अ
अ


नांदेड, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। नांदेड येथील दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टी, महानगर नांदेड व भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आशुतोष अमरनाथ राजूरकर आयोजित सार्वजनिक दहीहंडी महोत्सव २०२६ ला उपस्थित राहण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची माजी मुख्यमंत्री खा अशोक चव्हाण यांच्या समवेत भेट देऊन आमंत्रण देण्यात आले. या प्रसंगी सार्वजनिक दहीहंडीचे आयोजक डॉ आशुतोष अमरनाथ राजूरकर सुद्धा उपस्थित होते.

यंदाच्या या भव्य दहीहंडी सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे

प्रथम पारितोषिक: ₹ ३,३३,३३३/-

दिनांक: रविवार, ६ सप्टेंबर २०२६

वेळ: सायंकाळी ५:०० वाजता

स्थळ: यशवंत कॉलेज मैदान, नांदेड

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande