
नाशिक, 27 ऑगस्ट (हिं.स.)।
- केंद्र सरकारचे कांदा एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये गुरुवारी बाजार बंद झाले त्यावेळी दोनशे रुपयांनी कांद्याचे भाव उतरले आहेत येणाऱ्या काळामध्ये अजून भाव उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदी करून घेतल्यानंतर हा कांदा देशाच्या विविध भागांमध्ये पाठविण्यासाठी कांदा एक्सप्रेस सुरू केली. हे कांदा एक्सप्रेस काल बुधवारी सायंकाळी दिल्लीकडे रवाना झाली त्यानंतर गुरुवारी सकाळी कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये याचे परिणाम दिसून आले.
गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पिंपळगाव निफाड नाशिक व इतर भागांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाल्यानंतर बुधवारी जो चार हजार रुपये प्रति क्विंटल असलेला कांद्याचा भाव हा बाजार सुरू झाल्यानंतर लगेचच चारशे रुपयांनी पडला होता परंतु दुपारनंतर हा भाव थोडासा सुधारत दोनशे रुपयांनी वाढ झाली आणि ज्यावेळी गुरुवारी बाजार बंद झाले त्यावेळी कांद्याच्या भावामध्ये दोनशे रुपयाने घट झाली होती 3800 रुपये प्रति क्विंटल या दराने कांद्याची खरेदी शेवटच्या चरणामध्ये झाली आणि दोनशे रुपयाने कांद्याचे भाव उतरले शुक्रवारी रक्षाबंधनामुळे बाजार समिती बंद आहेत त्यामुळे शनिवारी लिलाव सुरू झाल्यानंतर अजून भाव कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI