चंद्रपूर : मनोरा येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण संपन्न
चंद्रपूर, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। राज्य शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, मनोरा व कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मनोरा येथे
चंद्रपूर : मनोरा येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण संपन्न


चंद्रपूर, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। राज्य शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, मनोरा व कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मनोरा येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या हस्ते झाले. यावेळी नागपूर विभागाचे नोडल अधिकारी डॉ. विजय डोईफोडे तसेच जिल्हा नोडल अधिकारी डॉ. लक्षदीप पारेकर यांनी प्रशिक्षणास भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. गजानन राऊत, डॉ. मिना मडावी, डॉ. संदीप भटकर, डॉ. भावेश वानखेडे, डॉ. मनोज शेंडे, डॉ. किशोर भट्टाचार्य, शोभा नैनावत, वंदना किन्नाके आणि रमेश घुटके यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

जिल्हास्तरावर आरोग्य सेवेच्या विविध घटकांशी संबंधित प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्स यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविका यांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाचा कालावधी दोन दिवसांचा असून, पहिल्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विविध विषयांवर सैद्धांतिक व प्रात्यक्षिक मार्गदर्शन, तर दुसऱ्या दिवशी गावातील सुमारे 10 ते 25 कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्राथमिक आरोग्य सेवेशी संबंधित प्रतिबंधात्मक व उपचारात्मक बाबींवर चर्चा करण्यात येते.

या विषयांवर झाले मार्गदर्शन : दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेच्या विविध घटकांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये गरोदरपण, प्रसूती व प्रसूतीपश्चात काळजी, नवजात व अर्भक आरोग्य सेवा, बालक व किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य, संसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, सामान्य व किरकोळ आजारांवरील उपचार, असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, डोळे व कान यांची प्राथमिक आरोग्य सेवा, मौखिक आरोग्य सेवा, वृद्धापकाळ व पॅलिएटिव्ह केअर, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य, योग व आयुष पद्धती.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande