रक्षाबंधनाआधी जळगावात सोने ४००० रुपयांनी, तर चांदी ५ हजारांनी स्वस्त
जळगाव, 27 ऑगस्ट (हिं.स.) रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण बाजारातून खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. कालच्या तुलनेत आज गुरुवारी (ता. २७) सोन्याच्या दरात तब्बल ४
रक्षाबंधनाआधी जळगावात सोने ४००० रुपयांनी, तर चांदी ५ हजारांनी स्वस्त


जळगाव, 27 ऑगस्ट (हिं.स.) रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण बाजारातून खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. कालच्या तुलनेत आज गुरुवारी (ता. २७) सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार रुपयांची घट झाली. त्याचसोबतच चांदीच्याही दरात ५ हजार रुपयांची घसरण झाली आहे जळगावच्या सुवर्ण बाजारात आज गुरुवारी सोने ४ हजार रुपयांनी घसरले. यामुळे जीएसटीसह सोन्याचा भाव १ लाख ६३ हजार रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. गुरुवारी ५ हजार रुपयांची घट होऊन चांदीचा भाव २ लाख ५२ हजार रुपये प्रतिकिलो इतका झाला रक्षाबंधनासाठी बहिणींकडून भावांसाठी राखी आणि भेटवस्तूंची खरेदी केली जात आहे. अशातच सोने-चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेषतः चांदीच्या राख्यांची खरेदी करणाऱ्या बहिणींसाठी कमी झालेले दर फायदेशीर ठरणार आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात सोने आणि चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला होता. त्यानंतर काही काळ दरात स्थिरता आली होती. मात्र, ऑगस्टच्या सुरुवातीला पुन्हा दर वाढले. मागील आठवड्यात मोठी घसरण झाल्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला दर काहीसे वाढले होते. आता पुन्हा सलग दोन दिवस दर खाली आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि बदलत्या परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत सुवर्ण बाजारावर होत असल्याने सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत.रक्षाबंधनाचा सणानिमित्त भंगाळे गोल्ड मध्ये विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. चांदीच्या राख्या ४०० रुपयांपासून, तर सोन्याच्या राख्या ३ हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. आपल्या लाडक्या भावासाठी खास आणि आकर्षक राखी खरेदी करण्यासाठी बहिणींची दुकानांमध्ये गर्दी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande