
यवतमाळ, 27 ऑगस्ट (हिं.स.)। यंदा जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाची निर्माण झालेली तूट शेतकर्!यांसाठी चिंताजनक आहे. आता पिकांवर तुडतुडे, फुलकिडींचा प्रादुर्भाव काही भागात दिसून येत आहे. या प्रकारामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता असून, शेतकर्!यांनी वेळीच उपाय करावा, असे आवाहन कृषी तज्ञांकडून केल्या जात आहे.
मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यामुळे यंदा खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलै महिन्यात शंभर मीमीहून अधिक पाऊस झाल्यानंतर शेतकर्!यांनी पेरण्या आटोपून घेतल्या. परंतु, पावसाचा दगाफटका सुरूच होता. मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होता. अशात जुलै महिन्यातील शेवटच्या दोन दिवसांत तब्बल १३५ मीमी पावसाची नोंद घेण्यात आली. अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील ११० हून अधिक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. कृषी विभागाने शेतीचे पंचनामे तातडीने केले. यात तब्बल ३७ हजार २६९ बाधित शेतकर्!यांची कोरडवाहू पिकांखालील ३५ हजार २७७.८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तर ७.९० टक्के बागायती, ९.४० टक्के बहुवार्षिक फळ पिके, असे एकूण ३५ हजार २९५.१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
त्यात ८४०.२७ हेक्टर शेतजमीन पूर्णता खरडून गेली आहे. नुकसानीच्या पंचनाम्यानंतर मदतीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला आहे. यातून सावरत नाही, तर पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे शेतकर्!यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहे. परंतु सर्वत्र पाऊस न झाल्यामुळे पिकांची अवस्था अतिशय खराब आहे. काही तालुक्यातील पिकांवर तुडतुडे, फुलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अतिवृष्टी आणि आता किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकर्!यांचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. किडींचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी आवश्यक फवारणी करणे गरजेचे आहे. परंतु, एकूण खर्च आणि उत्पन्न यात शेतकर्!यांना नक्कीच आर्थिक तोटा सहन करावा लागण्याची शक्यता कृषी तज्ञांनी बोलून दाखविली. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने शेतकर्!यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.
याबाबत यवतमाळचे निवृत्त सहयोगी संशोधन संचालक प्रमोद यादगीरवार म्हणाले की, काही भागातील शेती पिकांची परिस्थिती गंभीर आहे. किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्!यांनी पिवळे चिकट सापळे लावावे. त्यातही आर्थिक नुकसानीच्या पातळीबाबत शेतकर्!यांनी जागृत राहणे गरजेचे आहे. फवारणी खर्च आणि किडींमुळे होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न आता शेतकर्!यांनाच करावा लागणार आहे. शक्य असल्यास फवारणी करावी, अति फवारणीमुळे मित्र कीटकसुद्धा कमी होण्याचा धोका आहे.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी