
धाराशिव, 27 ऑगस्ट (हिं.स.)।
‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार
केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली उल्लेखनीय कामगिरी,देशाच्या जलदगतीने झालेल्या विकासाची गाथा तसेच जनतेच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या नवनवीन योजना आणि त्यांची काटेकोरपणे होणारी अंमलबजावणी याची माहिती नागरिकांना देण्यासाठी केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन ‘केंद्र सरकारची १२ वर्षे सेवा’ तसेच ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५ (VB-G-RAM-G Act 2025)’ या विषयांवर आधारित आहे.प्रदर्शनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती,विकासकामे आणि विविध क्षेत्रांतील प्रगती याबाबत नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. धाराशिव येथील मध्यवर्ती बसस्थानकात १ आणि २ सप्टेंबर २०२६ असे दोन दिवस हे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे,तसेच देशाच्या विकासाच्या वाटचालीची माहिती देणे हा या मल्टिमीडिया प्रदर्शनाचा उद्देश आहे. नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन विविध योजनांची आणि केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती जाणून घ्यावी,असे आवाहन सोलापूर येथील केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis