कर्जमुक्तीच्या निधीची शेतकऱ्यांना दिलासा; यवतमाळ बँकेला 95.77 कोटी प्राप्त
यवतमाळ, 27 ऑगस्ट (हिं.स.) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नजरा कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीकडे लागल्या आहेत. कर्जमुक्तीच्या लाभासाठी पात्र कोण ठरणार, आपले नाव यादीत येणार का, या प्रश्नांची उत्तरे शोधत शेतकरी योजनेच्या पोर्ट
‘मध्यवर्ती’च्या १२ हजार लाभार्थ्यांना दिलासा ४३ हजार कर्जखात्यांसाठी ३४९ कोटी प्राप्त


यवतमाळ, 27 ऑगस्ट (हिं.स.) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नजरा कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीकडे लागल्या आहेत. कर्जमुक्तीच्या लाभासाठी पात्र कोण ठरणार, आपले नाव यादीत येणार का, या प्रश्नांची उत्तरे शोधत शेतकरी योजनेच्या पोर्टलकडे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, तिसरी यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नसतानाच सोमवारी (ता. 24) शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक दिलासादायक बातमी समोर आली.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एकाच दिवसात तब्बल 95 कोटी 77 लाख 74 हजार 40 रुपयांचा कर्जमुक्ती निधी प्राप्त झाला आहे. या निधीचा लाभ तब्बल 11 हजार 971 लाभार्थ्यांना मिळणार आहे.

यापूर्वी प्राप्त झालेल्या निधीसह आतापर्यंत बँकेला 43 हजार 602 कर्जखात्यांसाठी एकूण 349 कोटी 60 लाख 57 हजार 835 रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

दरम्यान, कर्जमुक्तीच्या रकमेचा निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असला, तरी नवीन विशिष्ट क्रमांकाची तिसरी यादी अद्याप पोर्टलवर प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची उत्कंठा आणखी वाढली आहे.

‘आपले नाव यादीत आहे का?’ या एकाच प्रश्नाभोवती शेतकऱ्यांची उत्सुकता केंद्रित झाली असून, तिसरी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आणखी किती शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande