
अमरावती, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। जिल्हा स्त्री रुग्णालयातील जळीत कक्षाला आज, गुरुवारी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या समक्ष अधिकृतपणे सील लावून बंद करण्यात आले. अलीकडील गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.
आज सकाळी संबंधित विभागातील अधिकारी, रुग्णालय प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच कर्मचारी यांच्या उपस्थितीत जळीत कक्षाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कक्षाला सील लावण्यात आले. या कक्षात पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सेवा अथवा इतर कामकाज होणार नसल्याची माहिती मिळत आहे.
घटनेच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू असून, जळीत कक्षातील उपकरणे, व्यवस्थापन तसेच सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कक्ष बंद ठेवण्यात येणार असल्याचे समजते.
--------------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी