अमरावती - भांबोरा गावात वाघाचा कहर; शेतकऱ्यावर हल्ला करून घेतला जीव
अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.) मोर्शी तालुक्यात बिबट्याच्या व वाघाच्या हल्ल्याच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. तालुक्यातील भांबोरा गावच्या शेत शिवारातील शेतात काम करत असताना वाघाने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक
भांबोरात वाघाचा कहर! शेतकऱ्यावर हल्ला करून घेतला जीव परिसरातील शेतशिवारात प्रचंड भीतीचे वातावरण


अमरावती, 27 ऑगस्ट (हिं.स.) मोर्शी तालुक्यात बिबट्याच्या व वाघाच्या हल्ल्याच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. तालुक्यातील भांबोरा गावच्या शेत शिवारातील शेतात काम करत असताना वाघाने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास चरणदास ईखे वय 55 वर्ष राहणार भांबोरा हा शेतकरी आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आणि रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण भांबोरा आणि परिसरातील व सिंभोरा तुळजापूर येवती आष्टी आदी गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनेची माहिती मोर्शी वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. व नरभक्षक वाघाचा ड्रोन कॅमेराच्या मदतीने शोध सुरू केला आहे. मुतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. यावेळी ग्रामस्थांनी वनविभागाकडे मागणी केली आहे की, या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करण्यासाठी शिवारात पिंजरे लावावेत. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तात्काळ आर्थिक मदत द्यावी. तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात.गेल्या काही महिन्यांपासून मोर्शी तालुक्यात बिबट्याचा व वाघाचा वावर वाढला असून. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बिबट्या दिसला आहे. वनविभागाने वेळीच उपाययोजना केली नाही तर अजून जीव जाण्याची शक्यता आहे, असे संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, या घटनेमुळे शेतकरी सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा शेतात जाण्यास घाबरत आहेत.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande