
नंदुरबार, 27 ऑगस्ट (हिं.स.) जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत
असून माहे सप्टेंबर, 2026 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 07 सप्टेंबर, 2026
रोजी दुपारी 01-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला
आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी कळविले आहे.
जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर आणि
पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील शासकीय
कार्यालयात कामासबंधी वैयक्तिक तक्रारी/निवेदन सादर करावयास असल्यास प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या
सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या लोकशाही दिनात
दाखल कराव्यात. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल तक्रार/निवेदन यावर समाधान न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या पहिल्या
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार/निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित
राहून दाखल करावेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर