इंटेरिओ बाय गोदरेजने स्मार्ट लर्निंगवरील नवा अहवाल केला सादर
मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.)। गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक अग्रगण्य फर्निचर ब्रँड असलेल्या इंटेरिओ बाय गोदरेजने आपला नवीन अहवाल, “बियॉन्ड द स्क्रीन्स: द राइज ऑफ स्मार्ट लर्निंग स्पेसेस” सादर केला आहे. यामध्ये भारतातील शाळा तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण कसे
Interio by Godrej presents a new report on smart learning


मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.)। गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक अग्रगण्य फर्निचर ब्रँड असलेल्या इंटेरिओ बाय गोदरेजने आपला नवीन अहवाल, “बियॉन्ड द स्क्रीन्स: द राइज ऑफ स्मार्ट लर्निंग स्पेसेस” सादर केला आहे. यामध्ये भारतातील शाळा तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण कसे स्वीकारत आहेत आणि स्मार्ट शिक्षणासाठी प्रभावी वातावरण तयार करण्यासाठी काय आवश्यक आहे, याचे परीक्षण केले आहे. इंटेरिओ बाय गोदरेजच्या वर्कस्पेस अँड एर्गोनॉमिक्स रिसर्च सेलने विकसित केलेल्या या श्वेतपत्रिकेत, तंत्रज्ञान, एर्गोनॉमिक फर्निचर आणि लवचिक वर्गखोली मांडणी यांचा समावेश असलेले शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांचा सहभाग, सहकार्य आणि शिकण्याचे परिणाम कसे वाढवू शकते, याचा शोध घेतला आहे. हे संशोधन विविध विषय, वयोगट (19-28), प्रदेश, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांच्या विविध गटांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे, ज्यामुळे बदलत्या शैक्षणिक गरजा आणि आधुनिक शैक्षणिक वातावरणाला आकार देण्यात तंत्रज्ञानाची भूमिका यांचा मोठ्या प्रमाणावर अंदाज येतो.

या निष्कर्षांवर भाष्य करताना इंटिरिओ बाय गोदरेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि B2B व्यवसायाचे प्रमुख समीर जोशी म्हणाले, भारताची शिक्षण व्यवस्था म्हणजे 14.71 लाख शाळा आणि 24.69 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश असलेली एक विशाल यंत्रणा आहे; त्यामुळेच, उत्तम शैक्षणिक भविष्यासाठी अध्ययन-अध्यापनाच्या वातावरणाचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत सरकारने केलेल्या 1.47 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे तंत्रज्ञानावर आधारित वर्गखोल्यांचा स्वीकार वेगाने होत आहे. वर्गखोली ही आता केवळ माहिती देण्याची जागा राहिलेली नाही, तर ती परस्पर सहकार्य, सर्जनशीलता आणि चिकित्सक विचारसरणीला वाव देणारे पोषक वातावरण ठरते आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याच्या बाबतीत शाळांनी लक्षणीय प्रगती केली असली, तरी परिवर्तनाचा पुढील टप्पा अशा अध्ययन-स्थानांच्या निर्मितीमध्ये आहे, जिथे तंत्रज्ञानाची सांगड विचारपूर्वक केलेली रचना, एर्गोनॉमिक्स, लवचिकता आणि शैक्षणिक सुविधा यांच्याशी घातली जाईल. इंटिरिओ बाय गोदरेजमध्ये आमचा असा विश्वास आहे की, शिक्षणाचे भविष्य केवळ 'स्मार्ट उपकरणांवर' अवलंबून नसून ते 'स्मार्ट अध्ययन-स्थानांवर' अवलंबून आहे; अशी स्थाने जी शिक्षकांना अधिक चांगल्या प्रकारे शिकवण्यास आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास सक्षम करतात.

वर्गांचे तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण वातावरणात होणाऱ्या परिवर्तनावर श्वेतपत्रिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे. यातून असे दिसून येते की, सर्वेक्षण केलेल्या 100% शिक्षकांचा असा विश्वास आहे की, तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आकलनशक्ती सुधारते, तर 91% शिक्षकांनी औपचारिक तंत्रज्ञान प्रशिक्षण घेतले आहे. डिजिटल शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ही शिक्षकांमधील वाढती तयारी दर्शवते. या संशोधनात असेही आढळले की, सर्वेक्षण केलेल्या सर्व शाळांनी वर्गांमध्ये आधीच तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण केले आहे आणि ७५% शिक्षकांनी वर्गातील तंत्रज्ञानाला अखंड आणि सहजसोपे असे म्हटले आहे. तथापि, व्यापक स्वीकार असूनही, तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने वर्गातील अध्यापनासाठीच केला जात आहे. हे मूल्यमापन, विश्लेषण, संरचित अभिप्राय आणि वैयक्तिकृत शिक्षणासाठी त्याचा वापर वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण संधी दर्शवते.

अध्ययन निष्पत्ती सुधारण्यात वर्गाच्या रचनेच्या भूमिकेवरही हा अभ्यास प्रकाश टाकतो. त्यात असे आढळून आले की, वर्गातील फर्निचरची पुनर्रचना करू शकणारे 94% शिक्षक अधिक प्रभावी ठरतात, तर 79% विद्यार्थी अशा अध्ययन वातावरणाला प्राधान्य देतात जिथे सहयोगासाठी किंवा एकाग्र अभ्यासासाठी बसण्याची जागा बदलता येते. हे निष्कर्ष दर्शवतात की, आकर्षक अध्ययन वातावरण निर्माण करण्यासाठी लवचिक फर्निचर, एर्गोनॉमिक आसनव्यवस्था, प्रभावी ध्वनिशास्त्र आणि सुनियोजित दृकश्राव्य पायाभूत सुविधा हे तंत्रज्ञानासोबत आवश्यक पूरक घटक आहेत.

भारतातील 19 शहरांमधील स्मार्ट क्लासरूमने सुसज्ज असलेल्या शाळांमध्ये प्रवेशसंख्येत सरासरी 22% वाढ नोंदवली गेली आहे, जे तंत्रज्ञान-सक्षम शिक्षणाची सुलभता आणि विद्यार्थ्यांच्या सहभागावरील प्रभाव अधोरेखित करते. या श्वेतपत्रिकेत असेही म्हटले आहे की, केवळ तंत्रज्ञान शिकण्याच्या वातावरणात परिवर्तन घडवू शकत नाही. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अर्थपूर्ण शैक्षणिक परिणाम मिळतील याची खात्री करण्यासाठी स्क्रीनची दृश्यमानता, ध्वनीशास्त्र, वर्गाची मांडणी, एर्गोनॉमिक फर्निचर, विश्वसनीय देखभाल आणि एकात्मिक शिक्षण जागा हे तितकेच महत्त्वाचे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande