
* 'अमावी'च्या भागीदारीत लोणावळ्यात 'ताज माउंट कुसुर रिसॉर्ट अँड विलाज'चे उद्घाटन
मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.) - भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी असलेल्या 'इंडियन हॉटेल्स कंपनी'ने (IHCL) महाराष्ट्रातील लोणावळ्यात 'ताज माउंट कुसुर रिसॉर्ट अँड विलाज' सुरू करण्याची घोषणा केली आहे. देशातील एकमेव हॉस्पिटॅलिटी-केंद्रित रिअल इस्टेट ब्रँड असलेल्या 'अमावी'च्या (Amavi) भागीदारीत विकसित केलेला हा प्रकल्प 'ताज'च्या लक्झरी व्हिला क्षेत्रातील प्रवेशाचे प्रतीक आहे. मुंबई आणि पुणे यांच्या दरम्यान वसलेले लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात पसंतीचे आणि प्रतिष्ठित पर्यटन स्थळांपैकी एक आहे. सुंदर दऱ्या, सरोवरे आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे हिल स्टेशन पर्यटक, आरोग्य आणि निरामयता शोधणारे लोक तसेच 'सेकंड होम' खरेदी करणाऱ्यांना सातत्याने आकर्षित करते.
IHCL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छटवाल यांनी सांगितले, गेल्या शतकाहून अधिक काळापासून, 'ताज'ने आपले भव्य राजवाडे, ऐतिहासिक शहरातील हॉटेल्स, सफारी आणि निवासस्थानांच्या माध्यमातून लक्झरी हॉस्पिटॅलिटीची व्याख्या केली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली लक्झरी हॉटेल ब्रँड आणि भारतातील सर्वात शक्तिशाली ब्रँड म्हणून ओळखला जाणारा 'ताज' लक्झरी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आपले नेतृत्व अधिक दृढ करत आहे. 'ताज माउंट कुसुर रिसॉर्ट अँड विलाज'सह आम्ही ब्रँडेड व्हिला क्षेत्रात शानदार प्रवेश केला आहे. ग्राहकांच्या बदलत्या पसंतींना प्रतिसाद देत आम्ही आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे आणि लक्झरी रिअल इस्टेटच्या एका नवीन श्रेणीमध्ये आमच्या ब्रँडचा विश्वास, अतुलनीय सेवा आणि वारसा घेऊन आलो आहोत.
पश्चिम घाटातील निसर्गरम्य टेकड्यांच्या दरम्यान ३४ एकर जागेवर पसरलेला 'ताज माउंट कुसुर रिसॉर्ट अँड विलाज' हा एक एकात्मिक लक्झरी प्रकल्प आहे. यात ३२ ब्रँडेड विला आणि १०० खोल्यांचे भव्य 'ताज' रिसॉर्ट समाविष्ट आहे, जिथून आसपासचे सरोवर आणि दरीचे विहंगम दृश्य दिसते. आधुनिक 'बार्न-स्टाईल' वास्तुकलेने प्रेरित असलेल्या या विलामध्ये मोठ्या काचेच्या भिंती आणि प्रशस्त व्हरांडे आहेत, जे नैसर्गिक परिसराशी एकरूप होतात. या प्रकल्पात दोन एकरचा 'वाबी-साबी' सेंट्रल पार्क देखील समाविष्ट आहे, जो साधेपणा आणि निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या जपानी तत्त्वज्ञानावर आधारित आहे. येथे राहणाऱ्यांना मियावाकी जंगल, नेचर ट्रेल्स, झेन गार्डन, स्टारगेझिंग डेक, गोल्फ पुटिंग ग्रीन, फिटनेस लॉन आणि बहुउद्देशीय क्रीडांगण यांसारख्या सुविधांचा आनंद घेता येईल. या विशेष प्रकल्पामध्ये 'क्लब अमावी'चाही समावेश आहे, जिथे रहिवासी आरोग्य, मनोरंजन, बँक्वेटिंग आणि भोजन यांसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधांचा आनंद घेऊ शकतात.
'अमावी-क्लार्क्स ग्रुप ऑफ हॉटेल्स'चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अपूर्व कुमार म्हणाले, लोक स्वतःसाठी अधिक वेळ काढण्याच्या उद्देशाने म्हणजेच कुटुंब, निसर्ग आणि एकांत यांच्या सहवासात क्षण घालवण्यासाठी 'सेकंड होम' खरेदी करतात. मात्र, अनेकदा ही घरे केवळ आणखी एक जबाबदारी बनून राहतात. 'अमावी'मध्ये आमचा उद्देश ही मानसिकता बदलणे हा आहे. 'ताज माउंट कुसुर रिसॉर्ट अँड व्हिलाज' हे घराची खाजगी व शाश्वतता आणि 'ताज'च्या आदरातिथ्याची अतुलनीय सेवा व काळजी यांचा एक परिपूर्ण संगम आहे. पश्चिम घाटाच्या दऱ्यांमध्ये वसलेला हा प्रकल्प आमच्या या विश्वासाचे प्रतिबिंब आहे की, अर्थपूर्ण विकासाने जमिनीचा आदर केला पाहिजे आणि स्थानिक समुदायांसाठी संधी निर्माण केल्या पाहिजेत. आम्हाला 'माउंट कुसुर' हे केवळ लोकांच्या मालकीचे एक मालमत्ता-स्थळ न ठेवता, असे ठिकाण बनवायचे आहे जिथे लोक वारंवार परत येतील, एक असे ठिकाण जे एक खोल नाते निर्माण करेल आणि जिथे खरोखरच 'घर' असल्याचा अनुभव येईल.
हे ब्रँडेड व्हिलाज विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि त्यानंतर 'लीज-बॅक' कार्यक्रमाद्वारे रिसॉर्टच्या व्यवस्थापनांतर्गत समाविष्ट केले जातील. येथील रहिवाशांना 'ताज'च्या जगप्रसिद्ध आदरातिथ्य सेवांचा ज्यामध्ये कॉन्सिअर्ज सहाय्य, हाऊसकीपिंग आणि देखभालीचा समावेश आहे. तसेच रिसॉर्टच्या विविध प्रकारच्या मनोरंजन आणि आरोग्यविषयक सुविधांचा अनुभव घेता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी