डिजिटल भारताच्या सुरक्षेसाठी गोदरेजची नवी झेप; डेटा सेंटर क्षेत्रात विस्तार
मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.)। गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप (GEG) च्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाने भारतातील झपाट्याने विस्तारत असलेल्या डिजिटल पायाभूत सुविधा सुरक्षा क्षेत्रातील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. योट्टा आणि एनटीटी डेटा सेंटर यांच्याकडून
मुंबई


मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.)। गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप (GEG) च्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाने भारतातील झपाट्याने विस्तारत असलेल्या डिजिटल पायाभूत सुविधा सुरक्षा क्षेत्रातील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. योट्टा आणि एनटीटी डेटा सेंटर यांच्याकडून मिळालेल्या जबाबदारीनुसार, जेनेटेक सुरक्षा प्लॅटफॉर्मसोबत विनाअडथळा एकत्रित होणारे एकात्मिक की मॅनेजमेंट सोल्यूशन तैनात करण्यात येणार आहे.

केंद्रीकृत की मॅनेजमेंट, कार्यक्षम कार्यपद्धती, सध्याच्या तसेच भविष्यातील जेनेटेक सॉफ्टवेअर व्हर्जनशी असलेली सुसंगतता आणि अधिक सक्षम सुरक्षा यांचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे सादर केल्यानंतर हा आदेश देण्यात आला. गोदरेजचे धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदार जेनेटेक मार्फत ही संधी उपलब्ध झाली. महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी गोदरेजच्या सोल्यूशनची सिद्ध झालेली इंटिग्रेशन क्षमता आणि कौशल्य लक्षात घेऊन जेनेटेकने या सोल्यूशनची शिफारस केली. सध्या भारतात जेनेटेक सोबत इंटिग्रेट होणारी गोदरेज ही एकमेव संस्था असून, त्यामुळे कंपनीला या क्षेत्रात आघाडीचा फायदा मिळत आहे.

एका डेटा सेंटरसाठी मिळालेली जबाबदारी वा कामाची नियुक्ती यापासून सुरू झालेला हा उपक्रम आता अनेक डेटा सेंटरपर्यंत विस्तारला आहे. यामागे गोदरेजचे योट्टा आणि एनटीटीसोबत असलेले मजबूत भागधारक संबंध हे प्रमुख कारण आहे.

भारत डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना डेटा सेंटर हे राष्ट्रीय पायाभूत सुविधांचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहेत. एआय, क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल पेमेंट्स, उद्योगांचे डिजिटायझेशन, ई-गव्हर्नन्स आणि डेटा लोकलायझेशनच्या वेगवान विस्तारामुळे देशभरातील डिजिटल पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीला वेग मिळत आहे.

भारताची कार्यात्मक डेटा सेंटर क्षमता 2028 पर्यंत 3 GW पेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या डेटा सेंटर बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश होईल. डिजिटल पायाभूत सुविधांचा विस्तार होत असताना, केवळ क्षमता निर्माण करण्यापेक्षा लवचिकता, सुरक्षा, अनुपालन आणि कार्यात्मक सातत्य यांकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर, कुशाग्र प्रवेश व्यवस्थापन, ऑडिटसाठी सज्ज सुरक्षा प्रणाली आणि एकात्मिक पायाभूत सुविधा संरक्षण या डेटा सेंटर ऑपरेटर्ससाठी व्यवसायाच्या दृष्टीने अत्यावश्यक गरजा बनत आहेत.

विमानतळे, बँकिंग संस्था, सरकारी आस्थापना, उत्पादन सुविधा आणि इतर महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा मालमत्तांच्या सुरक्षेचा अनेक दशकांचा अनुभव असलेल्या गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने मिशन-क्रिटिकल वातावरणासाठी तयार करण्यात आलेल्या प्रगत प्रवेश व्यवस्थापन आणि एकात्मिक सुरक्षा सोल्यूशन्सच्या माध्यमातून डिजिटल पायाभूत सुविधा परिसंस्थेत आपली क्षमता विस्तारली आहे.

हा महत्त्वपूर्ण करार गोदरेजच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाचा पारंपरिक भौतिक सुरक्षा सेवा पुरवठादार पासून तंत्रज्ञानावर आधारित सोल्यूशन्स भागीदार म्हणून झालेला प्रवास दर्शवतो. यातून प्रत्यक्षातील भौतिक तसेच डिजिटल पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी योगदान दिले जात आहे.

कंपनी पुढील 2 वर्षांत विशेषतः डेटा सेंटर क्षेत्रातून 50 कोटी रु. महसूल मिळवण्याचे लक्ष्य ठेवत आहे. मिशन-क्रिटिकल सुविधांसाठी एकात्मिक सुरक्षा, की मॅनेजमेंट, अॅक्सेस कंट्रोल आणि पायाभूत सुविधा संरक्षण सोल्यूशन्सच्या आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत कंपनी हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाचे प्रमुख पुष्कर गोखले म्हणाले, “भारताची डिजिटल अर्थव्यवस्था सातत्याने विस्तारत असताना, क्लाउड सेवा आणि AI वर्कलोड्सपासून डिजिटल पेमेंट्स आणि उद्योगांच्या कार्यप्रणालीपर्यंत सर्वांना सक्षम करणारी डेटा सेंटर ही महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा मालमत्ता बनत आहेत. अशा पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी केवळ स्वतंत्र प्रणाली पुरेशा नसून, मोठ्या प्रमाणावर अत्यंत सुरक्षित एंड-टू-एंड दृश्यमानता, ट्रेसेबिलिटी, इंटिग्रेशन आणि कार्यक्षम कार्यप्रणाली उपलब्ध करून देणाऱ्या सोल्यूशन्सची आवश्यकता आहे.”

“डेटा सेंटरसोबतचा आमचा सहभाग भौतिक सुरक्षा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि इंटेलीजंट तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म यांच्यातील वाढत्या समन्वयाचे प्रतिबिंब आहे. तसेच, आमच्या डिझाइन आणि अभियांत्रिकी क्षमता, तंत्रज्ञान भागीदारी आणि सोल्यूशन-केंद्रित दृष्टिकोनाची ताकदही यातून दिसून येते. भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासाला भविष्यासाठी सज्ज सुरक्षा सोल्यूशन्सच्या माध्यमातून पाठबळ देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ही सोल्यूशन्स लवचिक, सुरक्षित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत करतील.

योट्टा आणि एनटीटीने नियुक्त केलेली ही जबाबदारी महत्वाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उच्च-वाढीच्या विभागांमध्ये गोदरेजच्या सुरू असलेल्या विस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. संशोधन, विकास आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आपल्या तज्ज्ञतेची सांगड घालत, गोदरेजचा सिक्युरिटी व्यवसाय अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षा सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहे आणि भारताच्या डिजिटल तसेच भौतिक पायाभूत सुविधांच्या अत्याधुनिक सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande