वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त आंबेडकरी जलसा उत्साहात
परभणी, ३१ ऑगस्ट (हिं.स.) : येथील लोककलावंत शाहीर विकास मंडळाच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त ‘आंबेडकरी जलसा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कलावंत, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची
वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त आंबेडकरी जलसा उत्साहात


परभणी, ३१ ऑगस्ट (हिं.स.) : येथील लोककलावंत शाहीर विकास मंडळाच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त ‘आंबेडकरी जलसा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कलावंत, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी. एच. सहजराव होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा सदस्य आकाश लहाने, विद्रोही लेखक यशवंत मकरंद, कलावंत शेषराव नाईकवाडे, कलावंत रेखा मनेरे, गायिका भारती राऊत आणि बळीराम आरगडे उपस्थित होते.

यावेळी लोककलावंत शाहीर विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शाहीर काशिनाथ उबाळे, उपाध्यक्ष किसन सावने, सचिव सुरेखा साळवे, सहसचिव विजय घोडके, कोषाध्यक्ष नामदेवराव ढेपे, सदस्य भास्कर कांबळे, सदस्य संतोषी भांगे यांच्यासह मंडळाचे अनेक कलावंत उपस्थित होते.

यावेळी विद्रोही कवी यशवंत मकरंद यांनी वामनदादा कर्डक यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला. “तुमचा प्रत्येक शब्द प्रज्ञासूर्याला अर्पण, बाबासाहेबांचे रूप पाहण्या वामन नावाचे दर्पण,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या साहित्याचा आणि शाहिरी परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला मिळालेले बळ आणि योगदान याची माहितीही कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली.

या उपक्रमामुळे नव्या पिढीला वामनदादा कर्डक यांच्या साहित्याची, शाहिरी परंपरेची तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची ओळख करून देण्यास मदत झाली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande