
नाशिक, 31 ऑगस्ट (हिं.स.) : प्रस्तावित नाशिक रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गौळाणे व आंबेबहुला परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी मुंबईत रणजीत हांडे मुख्य अभियांता, गिरीश जोशी सहव्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता रिंगरोडबाबत अंतिम निवाडा जाहीर केल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३१ मुंबईतील एमएसआयडीसी कार्यालय, बक्तावर बिल्डिंग, नरिमन पॉईंट येथे रिंगरोड प्रकल्पासाठी गौळाणे व आंबेबहुला परिसरातील शेतजमिनी बाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर एमएसआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा काण्यात आली. अशी मागणी बाधित शेतकरी अनेक दिवसांपासून करीत आहेत. मात्र, वारंवार मागणी करूनही बैठकीसाठी वेळ दिला जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला.
सन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार काटेकोरपणे कार्यवाही करावी, उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे, रिंगरोडशी संबंधित सर्व दस्तऐवज बाधित शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत तसेच प्रकल्पासंदर्भातील तांत्रिक बाबींवर एमएसआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक पोलिस बंदोबस्तात घेण्यात आली, त्यावेळी एसआयटी अहवालाची विचारणा केली असता हा अहवाल जिल्हा प्रशासनासी
निगडित आहे असे उत्तर देण्यात आले. तसेच त्यांनी रिंगरोडच्या तांत्रिक बाबी, भूसंपादन प्रक्रिया व उपलब्ध दस्तऐवजांबाबत समाधानकारक चर्चा करण्यात आली असता बरेचसे दस्तऐवज उपलब्ध करुन देण्यात आले. रिंगरोड प्रकल्पाला विरोध कायम ठेवण्याची भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे.यावेळी साहेबराव दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली दौलत चुंबळे, संजय चुंबळे, संतोष शहाणे, दत्तू थापेकर, सुरेश देशमुख, रमेश गडकरी, त्र्यंबक चुंभळे, राजाराम चुंबळे, ओमकार देशमुख, संजय चव्हाण, यांच्यासह बाधित शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI