अवघ्या नवव्या वर्षी 500 स्पर्धकांमध्ये मिळवला ब्लॅक बेल्ट रायगड, ३१ ऑगस्ट (हिं.स.) : नेरळजवळील दाम गावातील अवघ्या नऊ वर्षीय फातेह फौझान नजे याने ब्लॅक बेल्ट परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत दामट गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे या परीक्ष
Fateh tops among 500 students; earns black belt at age nine.


Fateh tops among 500 students; earns black belt at age nine.


अवघ्या नवव्या वर्षी 500 स्पर्धकांमध्ये मिळवला ब्लॅक बेल्ट

रायगड, ३१ ऑगस्ट (हिं.स.) : नेरळजवळील दाम गावातील अवघ्या नऊ वर्षीय फातेह फौझान नजे याने ब्लॅक बेल्ट परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत दामट गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत ५०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. त्यामध्ये फातेह हा सर्वांत कमी वयाचा विद्यार्थी ठरला.

लहान वयातच कराटेची गोडी लागलेल्या फातेहने नियमित सराव, कठोर प्रशिक्षण आणि शिस्तीच्या जोरावर ब्लॅक बेल्टपर्यंत मजल मारली. त्याच्या या यशामागे त्याचे वडील व प्रशिक्षक फौझान नजे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.

फौझान नजे हे थर्ड डॅन इंटरनॅशनल ब्लॅक बेल्ट असून, आयर्न फिस्ट कराटे अकॅडमीचे कोच व इन्स्ट्रक्टर इनचार्ज आहेत. वडिलांकडूनच कराट्याचे प्रशिक्षण घेत फातेहने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.

आयर्न फिस्ट कराटे अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काता, कुमिते, फायटिंग, फिजिकल फिटनेस तसेच सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण दिले जाते. कराट्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, मानसिक कणखरपणा आणि संकटांचा सामना करण्याची क्षमता विकसित करण्यावरही विशेष भर दिला जातो.

कोच फौझान नजे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला असून विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावली आहेत. त्यामुळे फातेहच्या या यशामुळे आयर्न फिस्ट कराटे अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

फातेहच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande