महिला टी२० आशिया कप २०२६: भारताची विजयी सलामी, ९४ धावांनी दणदणीत विजय
दुबई, 31 ऑगस्ट (हिं.स.)हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने महिला टी२० आशिया कप २०२६ मध्ये आपल्या मोहिमेची विजयासह सुरुवात केली. ''अ'' गटातील आपल्या पहिल्या सामन्यात भारताने थायलंडला ६५ धावांवर सर्वबाद करत ९४ धावांनी विजय मिळवला. हरमनप्
भारतीय महिला क्रिकेट संघ


दुबई, 31 ऑगस्ट (हिं.स.)हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने महिला टी२० आशिया कप २०२६ मध्ये आपल्या मोहिमेची विजयासह सुरुवात केली. 'अ' गटातील आपल्या पहिल्या सामन्यात भारताने थायलंडला ६५ धावांवर सर्वबाद करत ९४ धावांनी विजय मिळवला. हरमनप्रीतच्या संघाने थायलंडसमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण प्रत्युत्तरात थाई संघ पूर्ण २० षटके खेळू शकला नाही. शेफाली वर्माला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

यापूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना, शेफाली वर्माच्या (६४) अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत नऊ गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या. शेफालीने ३६ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि तीन षटकार मारले. तिने आपले १९ वे टी२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण करण्यासाठी २६ चेंडूंचा सामना केला, ज्यात सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. या सामन्यात टी२० पदार्पण करणाऱ्या प्रतिका रावलने २२ धावांचे, तर स्मृती मंधानाने १९ धावांचे योगदान दिले. थायलंडसाठी सुलीपोर्न लाओमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली, तिने तीन बळी घेतले.

भारताने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडसाठी नन्नपत कोंचरोएनकाईने सर्वाधिक धावा केल्या. तिने ४८ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या. उर्वरित १० थाई फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. नंदशी शर्माने १८ धावांत तीन बळी, दीप्ती शर्माने शून्य धावांत तीन बळी, तर श्री चरणीने १० धावांत दोन बळी घेतले.

या कामगिरीसह, दीप्ती शर्माने महिला टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला असून, तिच्या बळींची संख्या १७१ झाली आहे. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही धाव न देता तीन किंवा अधिक बळी घेणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू आहे.

भारतीय हरमनप्रीत कौर सामन्यानंतर म्हणाली की, फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. जुना चेंडू थोडा थांबून येत होता आणि फलंदाज चांगले फटके खेळू शकले नाहीत. थायलंडने चांगली गोलंदाजीही केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande