इराणचा जॉर्डनमधील अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ला
तेहरान, 31 ऑगस्ट (हिं.स.)।इराण आणि अमेरिकेदरम्यान पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दावा केला आहे की, लारक बेटावर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जॉर्डनमधील दोन अमेरिकन हवाई तळांवर बॅलि
इराणचा जॉर्डनमधील अमेरिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ला


तेहरान, 31 ऑगस्ट (हिं.स.)।इराण आणि अमेरिकेदरम्यान पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दावा केला आहे की, लारक बेटावर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जॉर्डनमधील दोन अमेरिकन हवाई तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या मदतीने संयुक्त हल्ला करण्यात आला.

आयआरजीसीने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तांत्रिक आणि देखभाल सुविधांना तसेच अझराक येथील मुवफ्फाक साल्ती एअर बेस आणि किंग हुसेन एअर बेसवर लढाऊ विमाने तैनात असलेल्या भागांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्सने पुढील हल्ल्यांना आणखी जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.तसेच, या हल्ल्यांमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणचे नियंत्रण कोणत्याही प्रकारे कमकुवत होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील लारक बेटावर असलेल्या इराणच्या दोन क्षेपणास्त्र प्रक्षेपण प्रणालींवर हल्ला केला आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलैच्या अखेरनंतर इराणच्या भूभागावर अमेरिकेने केलेला हा पहिला ज्ञात हल्ला आहे.अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, आज अमेरिकन लष्कराने लारक बेटावरील इराणच्या दोन लॉन्चर्सवर हल्ला केल्याची पुष्टी करता येते. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)च्या जवानांना होर्मुझच्या सामुद्रधुनीत समुद्री सुरुंग वाहून नेणारी रॉकेट्स डागण्याची तयारी करताना पाहण्यात आले होते.लारक बेट हे होर्मुझ बेटाच्या दक्षिणेला आणि केशम बेटाच्या पूर्वेला स्थित आहे. इराणची राजधानी तेहरानपासून लारक बेट आग्नेय दिशेला सुमारे १,१०० किलोमीटर अंतरावर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande