नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील पक्के अतिक्रमण जमीनदोस्त
नाशिक, 31 ऑगस्ट (हिं.स.)। - छत्रपती संभाजीनगर रोड ३० मीटर रोड अंतर्गत हायवेलगत मोठ्या पाण्याच्या पाईप लाईनचे काम सुरू असल्याने या रोडवरील पक्क्या स्वरूपाचे बांधकाम पत्र्याचे शेड, आरसीसी कंपाऊंड, टपऱ्या, हातगाड्या, मोठे होर्डिंगचे अतिक्रमण काढण्यात
नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील पक्के अतिक्रमण जमीनदोस्त


नाशिक, 31 ऑगस्ट (हिं.स.)।

- छत्रपती संभाजीनगर रोड ३० मीटर रोड अंतर्गत हायवेलगत मोठ्या पाण्याच्या पाईप लाईनचे काम सुरू असल्याने या रोडवरील पक्क्या स्वरूपाचे बांधकाम पत्र्याचे शेड, आरसीसी कंपाऊंड, टपऱ्या, हातगाड्या, मोठे होर्डिंगचे अतिक्रमण काढण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर रोड ३० मीटर रोड अंतर्गत हायवे लगत मोठ्या पाण्याच्या पाईप लाईनचे काम सुरू करायचे असल्याने या रोडवरील अतिक्रमण काढणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने मनपा मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये उपाआयुक्त अतिक्रमण सुवर्णा दखणे, वरिष्ठ लिपिक विनायक जाधव यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पक्क्या स्वरूपाचे बांधकाम, पत्र्याचे शेड आरसीसी कंपाऊंड जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. टपऱ्या, हातगाड्या हटविण्यात येऊन मोठे होर्डिंग देखील काढण्यात आले. तसेच पुढे ३० मीटर अंतर्गत रस्त्यावरील असलेले दुकानधारकांनी स्वतःहून काढून घ्यावे, असे आवाहन अतिक्रमण विभागाकडून करण्यात आले. यापुढेही अशीच कारवाई चालू राहील, असे अतिक्रमण विभागाने सांगितले.

या अतिक्रमण मोहिमेत पंचवटी गाडी प्रमुख प्रवीण बागूल, नंदू खांडरे, मधु पवार, राजू साळुंखे, दत्ता आहेर, विजय गरुड, सागर, सौरव बोडके, सुरज मोरे, सनी मयंकर, रोहन बैरागी, गोपीनाथ बोराडे, करण वार्डे, यश कटाळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande