
रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा एसटी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी लांजा आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक राजेंद्र पाटोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कर्मचारी व सभासदांशी असलेला सुसंवाद, कामाचा अनुभव, नेतृत्वगुण तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी असलेली सकारात्मक भूमिका यामुळे त्यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे मानले जात आहे.
पतसंस्थेच्या माध्यमातून कर्मचारी व सभासदांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, संस्थेचा आर्थिक कारभार अधिक सक्षम करणे आणि सभासदांच्या हिताचे निर्णय घेणे यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी