नांदेड-बेंगळुरू एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त वातानुकूलित डबे
परभणी, 31 ऑगस्ट (हिं.स.)। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेने एसएमव्ही बेंगळुरू-नांदेड-बेंगळुरू एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संख्येत कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 16593/16594च्या संरचनेत दोन अतिरिक्त तृत
रेल्वे लोगो


परभणी, 31 ऑगस्ट (हिं.स.)। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेने एसएमव्ही बेंगळुरू-नांदेड-बेंगळुरू एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संख्येत कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 16593/16594च्या संरचनेत दोन अतिरिक्त तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे वाढविण्यात आले असून, त्यामुळे या गाडीची डब्यांची संख्या 18 वरून 20 झाली आहे.

या डबेवाढीची अंमलबजावणी बेंगळुरू येथून सुटणार्या गाडीपासून 1 सप्टेंबर 2026 पासून, तर नांदेड येथून सुटणार्या गाडीपासून 3 सप्टेंबर 2026 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेड-बेंगळुरू मार्गावरील प्रवाशांना अतिरिक्त आसन क्षमता उपलब्ध होणार असून, वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत अधिक जागा मिळण्यास मदत होणार आहे. कायमस्वरूपी करण्यात आलेल्या या डबेवाढीमुळे विशेषतः वातानुकूलित प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. नांदेड आणि बेंगळुरू दरम्यान नियमित प्रवास करणार्या नागरिकांसाठी अतिरिक्त आसन क्षमता उपलब्ध झाल्याने आरक्षणाची सुविधा अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांनी आरक्षणासाठी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ, रेल्वे आरक्षण केंद्रे किंवा रेल्वेच्या ‘रेलवन’ या अनुप्रयोगाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande