
नवी दिल्ली, 04 ऑगस्ट (हिं.स.) भारतीय क्रिकेट संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेपूर्वी, बीसीसीआयने संघाच्या दोन प्रशिक्षकांना निरोप देणारी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. हे दोन प्रशिक्षक रायन टेन डोशे आणि टी. दिलीप आहेत.
रायनच्या जाण्याची घोषणा खूप आधीच झाली होती. तो आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफमध्येही सामील झाला आहे. पण, बीसीसीआयने आता त्याच्या जाण्याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
डोशे व्यतिरिक्त, संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनीही संघ सोडला आहे. अनेक माध्यमांनी तेही संघ सोडणार असल्याचा दावा केला होता. बीसीसीआयने आता याची अधिकृत घोषणा केली. बीसीसीआयने एक्सवरील एका पोस्टद्वारे त्या दोघांचे आभार मानले.
बीसीसीआयने लिहिले, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, तुमच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल धन्यवाद. तुमचे समर्पण, व्यावसायिकता आणि पडद्यामागील कठोर परिश्रम यांनी संघाच्या प्रवासात आणि यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तुमच्या कारकिर्दीतील पुढील वाटचालीसाठी तुम्हा दोघांनाही हार्दिक शुभेच्छा.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे