मैसूर येथे राष्ट्रीय एक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंची दमदार कामगिरी; ६ सुवर्ण, १४ रौप्य व २ कांस्य पदके
परभणी, 05 ऑगस्ट (हिं.स.)। कर्नाटकातील मैसूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उल्लेखनीय यश संपादन करत ६ सुवर्ण, १४ रौप्य आणि २ कांस्य पदके जिंकली. या यशात परभणीच्या खेळाडूंनीही मोलाचा वाटा उचल
मैसूर येथे राष्ट्रीय एक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंची दमदार कामगिरी; ६ सुवर्ण, १४ रौप्य व २ कांस्य पदके


परभणी, 05 ऑगस्ट (हिं.स.)।

कर्नाटकातील मैसूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उल्लेखनीय यश संपादन करत ६ सुवर्ण, १४ रौप्य आणि २ कांस्य पदके जिंकली. या यशात परभणीच्या खेळाडूंनीही मोलाचा वाटा उचलत जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. परभणीचे दिग्विजय पाते, प्रज्वल अंबोरे, अनिल सिंदगे आणि श्रीसाई बोराडे यांच्या संघाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत ज्युनिअर गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या संघाने दोन रौप्य व एक कांस्य पदकाची कमाई केली. तसेच परभणीचे पार्थ शिंदे आणि प्रेम कुटे यांनी मेन्स पिअर गटात शानदार कामगिरी करत एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. महाराष्ट्र संघाच्या एकूण उत्कृष्ट कामगिरीबद्दल संघाला सांघिक सुवर्ण पदकही प्रदान करण्यात आले. मुख्य प्रशिक्षक प्रदीप लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली रमण संगीतम व वेदांत मुंढे यांनी खेळाडूंची तयारी करून संघ घडविला. खेळाडूंच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लटपटे, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेने सर्व यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande