
नवी दिल्ली, 05 ऑगस्ट (हिं.स.)जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टेनिसपटू कार्लोस अल्कारजने उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे सिनसिनाटी ओपनमधून माघार घेतली. ही दुखापत त्याला एप्रिलपासून त्रास देत होती. स्पेनचा अल्कारज यूएस ओपनपूर्वी एक महत्त्वाची सराव स्पर्धा मानल्या जाणाऱ्या या हार्ड-कोर्ट स्पर्धेत आपल्या विजेतेपद कायम राखण्याच्या तयारीत होता.
स्पर्धेचे संचालक बॉब मोरान म्हणाले, आम्हाला माहित आहे की कार्लोस शक्य तितक्या लवकर कोर्टवर परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम्ही त्याच्या शीघ्र आरोग्यासाठी शुभेच्छा देतो आणि भविष्यात सिनसिनाटीमध्ये त्याचे स्वागत करण्याची आशा करतो.
अल्कारजची शेवटची स्पर्धा बार्सिलोना ओपन होती, त्यानंतर तो उर्वरित हंगामासाठी मैदानाबाहेर होता. अलीकडील फोटो आणि व्हिडिओमध्ये तो सराव करताना दिसला, ज्यामुळे ११ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सिनसिनाटी ओपनसाठी तो परत येईल अशी आशा निर्माण झाली होती. पण, यूएस ओपनमधील त्याच्या पुनरागमनाची आशा कायम आहे. तो यूएस ओपनचा गतविजेता देखील आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे