मराठी बालनाट्य दिनानिमित्त 'इतिहास महाराष्ट्राचा-2026' स्पर्धात्मक नाट्य महोत्सव उत्साहात
परभणी, 04 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी बालनाट्य दिनानिमित्त इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचा वारसा बालमनावर रुजविणारे बालरंगभूमी परिषदेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून अशा उपक्रमांमधून संस्कारक्षम पिढी घडण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन करुणाताई कुंडगिर
अ


परभणी, 04 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी बालनाट्य दिनानिमित्त इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचा वारसा बालमनावर रुजविणारे बालरंगभूमी परिषदेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून अशा उपक्रमांमधून संस्कारक्षम पिढी घडण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन करुणाताई कुंडगिर यांनी केले.

बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने 'इतिहास महाराष्ट्राचा-2026' या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित स्पर्धात्मक नाट्य महोत्सवाचे आयोजन वैष्णवी मंगल कार्यालय, परभणी येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपेंद्र दुधगावकर होते. उद्घाटक म्हणून सुशीलभैय्या देशमुख उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून करुणाताई कुंडगिर, नाट्यलेखक प्रा. रविशंकर झिंगरे, नाट्यकलावंत किशोर पुराणिक, प्रमोद बल्लाळ, गिरीश कऱ्हाडे तसेच परीक्षक म्हणून नाट्यलेखक-दिग्दर्शक विजय करभाजन, कथाकार बबन आव्हाड आणि रवी पुराणिक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नटराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी एकपात्री, नाट्यछटा, नाटुकले, नृत्य, समूह नाट्य आणि संगीतावर आधारित विविध कलाविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या शौर्य, न्यायप्रियता, लोककल्याणकारी कार्य आणि आदर्श जीवनकार्याचे प्रभावी सादरीकरण बालकलावंतांनी केले. त्यांच्या अभिनयाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबईच्या राज्य अध्यक्षा नीलमताई शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या 'इतिहास महाराष्ट्राचा' या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परभणी शाखेचे अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट, कोषाध्यक्ष संजय पांडे तसेच प्रकाश बारबिंड, संदीप राठोड, राजू देशमुख, श्रीकांत कुलकर्णी, शैलेश ढगे, मधुकर उमरीकर, बालाजी दामुके आणि अरुण टाक यांनी विशेष परिश्रम घेतले.

मराठी बालनाट्य दिनानिमित्त ज्येष्ठ कलावंत मधुकर उमरीकर यांनी 'श्यामची आई' या एकपात्री प्रयोगाचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमासाठी जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणी यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू वाघ यांनी केले. प्रास्ताविक त्र्यंबक वडसकर यांनी तर आभार प्रदर्शन दिनकर देशपांडे यांनी केले.

परभणीची रंगभूमी समृद्ध – सुशील देशमुख

कार्यक्रमाचे उद्घाटक सुशीलभैय्या देशमुख म्हणाले, परभणीची हौशी रंगभूमी आणि बालरंगभूमी ही राज्यात विशेष ओळख निर्माण करणारी आहे. राज्य नाट्य स्पर्धांमध्ये येथील कलावंतांनी सातत्याने परभणीचा नावलौकिक वाढविला आहे. बालकांसाठी सातत्याने कार्य करणारी बालरंगभूमी परिषद ही एकमेव संस्था असून तिचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.:

स्पर्धेचा निकाल जाहीर

'इतिहास महाराष्ट्राचा-2026' स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावी प्रकाश टाकला.

एकल स्पर्धा (प्रथम गट):

प्रथम – जिगीषा आठवे

द्वितीय – ऋषिका कांबळे

तृतीय – दुर्गा देशमुख

एकल स्पर्धा (द्वितीय गट):

प्रथम – साध्वी लाड

द्वितीय – सई चिटणीस

तृतीय – श्री जाधव

समूह गट:

प्रथम – सिद्धेश्वर विद्यालय, जिंतूर

द्वितीय – नरसिंह विद्यामंदिर, पोखरणी

तृतीय (विभागून) – एन.व्ही.एस. मराठवाडा हायस्कूल, परभणी, गांधी विद्यालय व कृषी सारथी शाखा, परभणी.

स्पर्धेचे परीक्षण नाट्यलेखक-दिग्दर्शक विजय करभाजन, कथाकार बबन आव्हाड आणि रवी पुराणिक यांनी केले. स्पर्धेचे संचालन दिनकर देशपांडे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande