अमरावतीत जड वाहनबंदीत अत्यावश्यक सेवांना प्रशासनाचा दिलासा
रेशन, इंधन व परीक्षा वाहनांना प्रवेश अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)।शहरात सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लागू असलेल्या जड वाहन प्रवेशबंदीतून अत्यावश्यक सेवाच्या काही वाहनाना जिल्हा प्रशासनाने सूट दिली आहे. राजापेठ उड्डाणपुलावरील भीषण अपघातानंतर रस्ते स
जड वाहनबंदीत अत्यावश्यक सेवांना प्रशासनाचा दिलासा


रेशन, इंधन व परीक्षा वाहनांना प्रवेश

अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)।शहरात सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लागू असलेल्या जड वाहन प्रवेशबंदीतून अत्यावश्यक सेवाच्या काही वाहनाना जिल्हा प्रशासनाने सूट दिली आहे. राजापेठ उड्डाणपुलावरील भीषण अपघातानंतर रस्ते सुरक्षा अबाधित ठेवणे आणि प्राणघातक अपघातांना आळा घालण्यासाठी ही बंदी लागू करण्यात आली होती. मात्र, धान्य, इंधन आणि परीक्षेसंबंधी साहित्याचा, पुरवठा बाधित होऊ नये, यासाठी प्रशासनाने सुधारित आदेश काढला आहे.बीपीसीएल आणि आयओसीएल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार लक्ष्यानिर्धारित सार्वजनिक वितरण प्रणाली असा स्पष्ट फलक असलेली हिरव्या रंगाची रेशन धान्य वाहतूक करणारी वाहने, एचपीसीएल, कंपन्यांचे पेट्रोल, डिझेल व एलपीजी सिलिंडर वाहतूक करणारे अधिकृत टँकर, तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा साहित्य वाहून नेणारा विशेष ट्रक (एमएच २७-डीटी ०५८२) यांना प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे.नागरिकांची अन्नसुरक्षा, इंधनपुरवठा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन ही विशेष सवलत देण्यात आली आहे. सवलतीचा गैरवापर करून व्यावसायिक किंवा बिगर-अत्यावश्यक मालाची वाहतूक केल्यास भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.--------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande