बीडमध्ये शाळेच्या आवारातच सर्पदंश झाल्याने १० वर्षीय चिमुकलीचा अंत
बीड, 06 ऑगस्ट (हिं.स.)। शिरूर तालुक्यातील शृंगारवाडी फाटा येथील बाल नंदनवन इंग्लिश स्कूलच्या पटांगणात आज सकाळी एका १० वर्षीय विद्यार्थिनीला सर्पदंश होऊन तिचा करुण अंत झाला. सारिका संतोष नरुटे असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे
सर्पदंशाने मुलीचा मृत्यू


बीड, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

शिरूर तालुक्यातील शृंगारवाडी फाटा येथील बाल नंदनवन इंग्लिश स्कूलच्या पटांगणात आज सकाळी एका १० वर्षीय विद्यार्थिनीला सर्पदंश होऊन तिचा करुण अंत झाला. सारिका संतोष नरुटे असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे शाळा परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि प्रशासनाच्या ढिसाळपणाचा अत्यंत गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मूळची गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील असलेली सारिका सध्या शृंगारवाडी फाटा येथे राहत होती. आज सकाळी शाळेच्या आवारात असताना तिला अचानक सापाने दंश केला. या घटनेनंतर तिला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी निष्पाप चिमुकलीचा असा बळी जाणे अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत असून, लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये मोठी असुरक्षितता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande