भव्य रथयात्रेच्या नियोजनार्थ बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।भाजपा, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य रथयात्रेच्या नियोजनार्थ आज बैठक संपन्न झाली.या बैठकीस राज्याचे कॅबिनेट मं
अ


छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।भाजपा, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य रथयात्रेच्या नियोजनार्थ आज बैठक संपन्न झाली.या बैठकीस राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. अतुलजी सावे तसेच माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. ना. डॉ. भागवत कराड यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

बैठकीत संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य रथयात्रेच्या यशस्वी आयोजनाबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. तसेच आगामी स्वातंत्र्यदिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या “हर घर तिरंगा” अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भातही विस्तृत चर्चा करून विविध जबाबदाऱ्यांचे नियोजन करण्यात आले.

याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष श्री.किशोर शितोळे, माजी आमदार श्री.संजय जी केनेकर, फुलंब्री विधानसभा आमदार सौ.अनुराधा ताई चव्हाण, महापौर श्री.समीर दादा राजूरकर, प्रदेश चिटणीस सौ.रेखा ताई कुलकर्णी, सभागृह नेते प्रा.गोविंद केंद्रे, श्री.बापू घडामोडे, सरचिटणीस. सौ.छायाताई खाजेकर, ताराचंद गायकवाड, श्री.रामेश्वर भादवे, आदि जिल्हा, मंडळ विविध प्रकोष्ट आघाडी अध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक बंधू भगिनी उपस्थिती होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande