अतिवृष्टी नुकसानीच्या आर्थिक पॅकेजसाठी खा. डॉ. अजित गोपछडेंनी घेतली अमित शाहांची भेट
नांदेड, 06 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्रातील अतिवृष्टी व भीषण पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पुनर्बांधणीसाठी विशेष आर्थिक पॅकेजसह नांदेड आणि महाराष्ट्राच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची खासदार डॉ. अज
अ


नांदेड, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

महाराष्ट्रातील अतिवृष्टी व भीषण पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पुनर्बांधणीसाठी विशेष आर्थिक पॅकेजसह नांदेड आणि महाराष्ट्राच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नवी दिल्लीत भेट घेऊन निवेदने सादर केली.

महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक सहाय्य संदर्भात २०२५ च्या पुरामुळे झालेल्या व्यापक नुकसानीचे वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी 'पोस्ट डिजास्टर नीड्स असेसमेंट' (PDNA) ची उच्चस्तरीय बैठक तातडीने आयोजित करून राज्याला पुनर्बांधणीसाठी विशेष आर्थिक निधी उपलब्ध करून देणे.

लंगर सेवेला GST सूट संदर्भात शीख पंथाचे पवित्र श्रद्धास्थान तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथील २४ तास सुरू असणाऱ्या मोफत लंगर सेवेसाठी खरेदी साहित्यावर संपूर्ण GST सूट देणे व सेवा भोज योजनेत समावेश करणे.

रेल्वे स्थानकाचे नामकरण संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार जी यांच्या ऐतिहासिक मूळ भूमीचा सन्मान करत धर्माबाद रेल्वे स्थानकाचे नाव परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार रेल्वे स्थानक असे करणे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande