आषाढी वारीत जळगाव एसटी विभागाच्या तिजोरीत कोटींची कमाई
जळगाव, 06 ऑगस्ट (हिं.स.)आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनी यंदाही एस.टी. महामंडळाच्या प्रवासाला पसंती दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील तब्बल ५०,७७९ भाविक-प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासाचा लाभ घेतला. प
आषाढी वारीत जळगाव एसटी विभागाच्या तिजोरीत कोटींची कमाई


जळगाव, 06 ऑगस्ट (हिं.स.)आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनी यंदाही एस.टी. महामंडळाच्या प्रवासाला पसंती दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील तब्बल ५०,७७९ भाविक-प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासाचा लाभ घेतला. प्रवाशांच्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळे जळगाव विभागाच्या उत्पन्नात गतवर्षाच्या तुलनेत तब्बल २१.७७ टक्क्यांची घवघवीत वाढ झाली असून, महामंडळाच्या तिजोरीत २ कोटी ५६ लाख ६० हजार २६० रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला गेल्या वर्षी जिल्हाभरातून ४२,८६२ प्रवाशांनी एसटीने प्रवास केला होता. यंदा यात तब्बल ७,९१७ प्रवाशांची भर पडली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विभागाने फेऱ्यांमध्येही मोठी वाढ केली होती.

गेल्या वर्षीच्या ४७२ फेऱ्यांच्या तुलनेत यंदा ५५४ फेऱ्या चालवण्यात आल्या म्हणजेच ८२ अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात आल्या. यासाठी बसने २ लाख ७३ हजार ३९८ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्याचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.सुमारे ५० हजार प्रवाशांना फायदा महिलांसाठी ५०% सवलत, ज्येष्ठांसाठी मोफत प्रवासाच्या योजनेमुळे वारकऱ्यांनी एसटीला पहिली पसंती दिली. या सवलतींचे मूल्य १ कोटी ८१ लाख राहिले, तर प्रत्यक्ष विना सवलत तिकीटातून ७४.८८ लाखांचा महसूल मिळाला.यात सुरुवातील तालुका, नंतर प्रवासी संख्या व त्यानंतर मिळालेले उत्पन्न आहे.

जळगाव: ५,२८० प्रवासी संख्या (२८,८५, ७९२ उत्पन्न), यावल : ४,८८८ (३६,२५,७६३), चाळीसगाव : ५,२३९ (२५,७२,१३०), अमळनेर : ३,३१५ (२७,५७,४६२), चोपडा : ३,८२० (१९,६३,२३४), जामनेर : ६, २८९ (१८,०९,६९९), रावेर: ४,३३८ (४०,९८,७६७), मुक्ताईनगर : ३,९३८ (२७,८१,६००), पारोळा : ५,११६ (२३,३४,५५५), भुसावळ : १,१२८ (१६,४१,१६१), एरंडोल : ३,९२० (२३,१०,७३३).

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande