पैठण शहरात एकाच रात्री तब्बल १६ गाढवे चोरीला गेल्याने खळबळ
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। पैठणमधून १६ गाढवे चोरीला गेल्याची माहिती हाती आली आहे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात एकाच रात्री तब्बल १६ गाढवे चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
पैठण शहरात एकाच रात्री तब्बल १६ गाढवे चोरीला गेल्याने खळबळ


छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। पैठणमधून १६ गाढवे चोरीला गेल्याची माहिती हाती आली आहे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात एकाच रात्री तब्बल १६ गाढवे चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. माती, वाळू व इतर साहित्य वाहतूक करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुंभार समाजातील पाच कुटुंबांचे सुमारे पाच लाख रुपये किमतीची गाढवे अज्ञात चोरट्यांनी आयशरसदृश मालवाहू वाहनातून नेल्याचा संशय आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असला, तरी वाहनाचा क्रमांक स्पष्ट दिसत नाही. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांचा रोजगार धोक्यात आला असून, पोलिसांनी तातडीने गाढवांचा व चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande