
कोल्हापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।जिल्ह्यातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्येच्या घटना गंभीर असून त्यासाठी ठोस उपाय योजना कराव्यात. यासाठी गावस्तरावर सुक्ष्म नियोजन करुन मुलींचे जन्मदर सुधारणे, गर्भलिंग निवड व कन्या भ्रूणहत्या रोखणे, मुलींचे संरक्षण, आरोग्य आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे, मुलींची माध्यमिक शिक्षणातील नावनोंदणी वाढवणे व शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे, समाजात मुलींबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
बेटी बचाव बेटी पढाओ या योजने अंतर्गत जिल्हा स्तरीय टास्कफोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालानात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी सुहार वाईगडे, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनंदा गायकवाड, डॉ. दिपक मेंढेकर, महिला सक्षमीकरण केंद्राच्या व्यवस्थापक शर्वरी भि. काटकर, पोलीस उपनिरिक्षक अंजली केसरकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन काकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar