लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा, विद्यार्थिनीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलत भंडारी कुटुंबीयांचा आदर्श
अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)। विवाहसोहळ्यांमधील वाढता दिखाऊपणा आणि अनावश्यक खर्चाला छेद देत धामणगावरेल्वे येथील भंडारी कुटुंबीयांनी समाजापुढे प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. मुलगा यश भंडारी यांच्या विवाहानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत एका ग
लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा


अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

विवाहसोहळ्यांमधील वाढता दिखाऊपणा आणि अनावश्यक खर्चाला छेद देत धामणगावरेल्वे येथील भंडारी कुटुंबीयांनी समाजापुढे प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. मुलगा यश भंडारी यांच्या विवाहानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत एका गरजू व होतकरू विद्यार्थिनीच्या संपूर्ण वर्षभराच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी सामाजिक बांधीलकी जपली. सध्या विवाहसोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सजावट, मनोरंजन आणि विविध कार्यक्रमांवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. अशा परिस्थितीत गांधी चौक परिसरातील प्रसन्न भंडारी व पूजा भंडारी यांनी आपल्या मुलाच्या विवाहाला सामाजिक सेवेची जोड देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विवाहसोहळ्याच्या मंचावर श्रीराम शिक्षण संस्थेतील गरजू व होतकरू विद्यार्थिनी संस्कृती हिला शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी लागणाऱ्या संपूर्ण शैक्षणिक साहित्याचा व वर्षभराच्या शैक्षणिक खर्चाचा लाभ प्रदान केला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा आर्थिक भार हलका झाला असून तिच्या शैक्षणिक वाटचालीला मोठा आधार मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande