
एनसीएस चे पथक दाखल
सुरगाणा, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
नाशिक जिल्ह्यातील भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत असून आज गुरुवारी दुपारी देखील जिल्ह्यातील पेठ सुरगाणा कळवण या तीन तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची प्राथमिक माहिती आपत्ती निवारण केंद्राकडून देण्यात आली आहे. दरम्यान या भागांमध्ये सातत्याने जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे एनसीएस चे पथक देखील या भागामध्ये दाखल झालेले आहे.
नासिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा पेठ दिंडोरी या भागामध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणविण्याचे प्रमाण हे आजही सुरूच आहे. त्यामुळे या भागांमध्ये नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मागील पंधरा दिवसापासून या परिसराचे भूकंपाचे धक्के जाणवत आहे. त्याचा अभ्यास करून उपाययोजना केल्या जात आहेत परंतु या भागातील सातत्याने हलक्या स्वरूपाचे जे भूकंपाचे धक्के जाणवत आहे ते प्रमाण सुरू असल्याचे समोर येत आहे.
जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज गुरुवारी दुपारी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे तीन वाजून 40 मिनिटांनी बोरगाव येथे कळवण तालुक्यातील दळवट येथे तीन वाजून 38 मिनिटांनी आणि पेठ तालुक्यातील आसावरी या ठिकाणी तीन वाजून 38 मिनिटांनी भूकंपाचे टक्के जाणवेल याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या धक्क्यांमुळे या भागांमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली असून या सर्व प्रकरणावरती प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे आपत्ती निवारण केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान या सर्व भागांमध्ये जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याबाबत पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय चिन्हांकित केंद्राचे अधिकारी या परिसरामध्ये दाखल झाले असून ते या भागामध्ये पाहणी करीत असून लवकरच त्याबाबतचा अहवाल ते सादर करणार आहेत. त्यानंतर प्रशासन पुढील पावले उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV