छ. संभाजीनगर - सुनिल राणे यांनी साधला विविध कृषी विषयांवर शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। चित्ते पिंपळगाव, ता. व जि. छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनिल राणे हे मराठवाडा विभाग दौऱ्यानिमित्त आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमास उपस्थित राहिले. यावेळी चित्ते पिं
अ


छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। चित्ते पिंपळगाव, ता. व जि. छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनिल राणे हे मराठवाडा विभाग दौऱ्यानिमित्त आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमास उपस्थित राहिले.

यावेळी चित्ते पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देत कर्जमाफीसह विविध कृषी विषयांवर शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. शेतकऱ्यांच्या समस्या, अपेक्षा व अडचणी जाणून घेत त्यांच्या निराकरणासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी आमदार नारायण कुचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री. किशोरजी शितोळे, आमदार श्री. सुहास शिरसाट, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. राहुलभैय्या लोणीकर तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande