यवतमाळमध्ये महावितरण कार्यालयात घातला अभियंत्याच्या खूर्चीला हार
यवतमाळ, 06 ऑगस्ट (हिं.स.)। तालुक्यातील मुकूटबन येथील महावितरण कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत युवासेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. संबंधित अभियंता कार्यालयात अनुपस्थित असल्याचा आरोप करीत युवासेनेचे निलेश बेलेकार यांच्या नेतृत्व
महावितरण कार्यालयात घातला अभियंत्याच्या खूर्चीला हार


यवतमाळ, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

तालुक्यातील मुकूटबन येथील महावितरण कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत युवासेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. संबंधित अभियंता कार्यालयात अनुपस्थित असल्याचा आरोप करीत युवासेनेचे निलेश बेलेकार यांच्या नेतृत्वात कार्यालयातील रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ कार्यालय परिसरात चर्चेला उधाण आले होते. युवासेनेच्या पदाधिकार्!यांनी सांगितले की, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वीजबिलातील दुरुस्ती, नवीन वीजजोडणी, मीटर बदल, तांत्रिक बिघाड, कृषी पंपांची प्रकरणे तसेच इतर विविध कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने कार्यालयात येतात. मात्र, जबाबदार अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने नागरिकांची कामे खोळंबतात. दूरवरच्या गावातून आलेल्या नागरिकांना तासंतास प्रतीक्षा करावी लागते, तर काहींना काम न होता परत जावे लागते, असा आरोप आंदोलकांनी केला.

यावेळी युवासेनेचे निलेश बेलेकार म्हणाले, ‘महावितरणसारख्या अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालयात अधिकारीच अनुपस्थित असतील, तर नागरिकांच्या समस्या कोण सोडवणार, सामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. कार्यालयीन वेळेत अधिकार्!यांनी उपस्थित राहून नागरिकांची कामे तातडीने मार्गी लावावीत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकार्!यांवर कारवाई करण्याची मागणी करीत भविष्यातही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला. दरम्यान, या आंदोलनादरम्यान कार्यालयात आलेल्या नागरिकांनीही त्यांच्या समस्या मांडल्या. अनेकांनी कामे रखडत असल्याची नाराजी व्यक्त केली. या संदर्भात महावितरणच्या संबंधित अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सोमवारी पांढरकवडा उपविभागीय कार्यालयात आयोजित अधिकृत बैठकीसाठी उपस्थित राहावे लागल्याने मुकूटबन कार्यालयात हजर राहणे शक्य झाले नाही.

-------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande