छ. संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृह निविदेसाठी मुदतवाढ
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।नियोजन भवन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील नियोजित उपहारगृह कँटीन चालविणेसाठी खाजगीरित्या भाडेतत्त्वावर स्थानिक स्तरावरील इच्छुक, पात्र व अनुभवी कंत्राटदारांकडून दरपत्रके मागविण्यात आली होती.
छ. संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृह निविदेसाठी मुदतवाढ


छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।नियोजन भवन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील नियोजित उपहारगृह कँटीन चालविणेसाठी खाजगीरित्या भाडेतत्त्वावर स्थानिक स्तरावरील इच्छुक, पात्र व अनुभवी कंत्राटदारांकडून दरपत्रके मागविण्यात आली होती. परंतु, दि. 4 ऑगस्ट 2026 पर्यंत केवळ दोनच दरपत्रके प्राप्त झाल्याने, प्रशासनाने सदर दरपत्रक सुचनापत्रास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार दि.5 ऑगस्ट 2026 पासून दि. 13 ऑगस्ट 2026 पर्यंत सदर निविदा भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी, इच्छुक आणि पात्र कंत्राटदारांनी जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ https://jalna.gov.in तसेच https://mahatenders.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आलेल्या पूर्वीच्या निविदेमधील अटी व शर्तींच्या अधीन राहून आपली निविदा विहित मुदतीत सादर करावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande