
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। अवैध वाळूसाठ्यांवर कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सुमारे ६० हजार ब्रास वाळूचा घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंबेलोहळ येथे या उपक्रमाचा शुभारंभ आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते झाला. केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनांतील वाळूअभावी रखडलेली घरे पूर्ण करण्यासाठी ही वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे. जप्त वाळूचा लिलाव न करता थेट लाभार्थ्यांना देण्याच्या निर्णयामुळे शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणातील अवैध वाळूसाठा प्रशासनाच्या निदर्शनास कसा आला नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis