छ. संभाजीनगर - कटखेडा येथे डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य पुतळ्याचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। कटखेडा येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पार पडला. कटखेडा (ता. अंबड, जि. जालना): साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कटखेडा येथे भव्य आणि उत्स
अ


छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। कटखेडा येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पार पडला.

कटखेडा (ता. अंबड, जि. जालना): साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कटखेडा येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना उपनेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपल्या मनोगतात आमदार अर्जुनराव खोतकर यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्य स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी कृष्णा पांडव, संदीप साबळे, पीटर खदारे, ज्ञानेश्वर जराड, बद्री जराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन विलास इन्चाळ, राहुल इन्चाळ, प्रभाकर इन्चाळ, पवन इन्चाळ, शरद इन्चाळ आणि दविड साठे यांनी केले होते. कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनी, युवक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande