छ. संभाजीनगर - विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्हाधिकारी कार्यालयात मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वपूर्
अ


छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्हाधिकारी कार्यालयात मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलसंधारण, पाणलोट विकास, मृदसंवर्धन, शेततळी, नाला खोलीकरण, बंधारे तसेच इतर विकासकामांच्या सद्यस्थितीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

मंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर देत, शेतीला शाश्वत आधार देण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन आणि भूजल पातळीत वाढ होणे आवश्यक असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी नियोजन, नियमित देखरेख आणि कामांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत प्रलंबित कामे, उपलब्ध निधी, मंजूर प्रकल्पांची सद्यस्थिती, कामांच्या प्रगतीचा वेग तसेच आगामी नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील मृद व जलसंधारणाची कामे वेळेत, दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

या बैठकीस आमदार अर्जुनभाऊ खोतकर, आमदार संतोष पाटील दानवे, आमदार हिकमत उढान, जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवरिया, मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande