छ. संभाजीनगर - भव्य कलश वंदन यात्रेच्या प्रारंभस्थळाची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। जगदगुरू संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कलश वंदन यात्रेच्या प्रारंभस्
अ


छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। जगदगुरू संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कलश वंदन यात्रेच्या प्रारंभस्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, तसेच नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जगतगुरू संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. छत्रपती संभाजी नगर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे लवकरच हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande