
लातूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
वैशालीनगर, निवळी (लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्यास 'डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन-इंडिया, पुणे' (DSTA) यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना - २०२६ हा मानाचा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल जळकोट तालुका काँग्रेस कमिटी, विविध सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन आणि विविध गावांच्या सरपंचांच्या वतीने विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांची बाभळगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन सत्कार करण्यात आला व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.
जळकोट तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
याप्रसंगी बाभळगाव येथे भेट घेऊन सत्कार करणाऱ्या शिष्टमंडळात जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मारोती पांडे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य रमन अदावळे, जळकोट पंचायत समितीचे सभापती संभाजी कोंसबे, उपसभापती माधव वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर तसेच धनराज दळवे, वैजनाथ चव्हाण, मंगेश हुडेकर, अल्पसंख्याक अध्यक्ष नूर पठाण, सहकार बोर्ड संचालक आनंद आगलावे, मच्छिंद्र केद्रे, विनायक केंद्रे, व्यकंट केंद्रे, मुजमील मुंडेकर, मंगरुळचे चेअरमन धनराज पाटील यांच्यासह जळकोट तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, विविध सेवा संस्थांचे चेअरमन, सरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis