जळकोट तालुका एस आय आर मध्ये राज्यात प्रथम
लातूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। जळकोट तालुक्यात विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, यात तालुक्याने १०० टक्के काम पूर्ण केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य निवडणुक अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी स
एस आय आर मध्ये राज्यात प्रथम


लातूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

जळकोट तालुक्यात विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, यात तालुक्याने १०० टक्के काम पूर्ण केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य निवडणुक अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजेश लांडगे तालुक्यातील केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे अभिनंदन केले आहे. मतदार यादी पुनरिक्षणाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजेश लांडगे यांनी वेळोवेळी बैठका, सुचना दिल्यामुळे भारत निर्वाचन आयोग पुनरीक्षण कार्यक्रम नागरिकांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. घरोघरी भेट देणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहनही उपजिल्हाधिकारी सुशांत शिदे, तहसीलदार लांडगे यांनी नागरिकांना केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत तालुक्यातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत फॉर्म भरण्यास सहकार्य केले. विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण ही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया मानली जात होती. प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज भरून घेणे अशी जबाबदारी बीएलओंनी पार पाडली. विशेष म्हणजे, या कालावधीत बहुतांश शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असतानाही बीएलओंनी समन्वय साधत काम प्रभावीपणे पूर्ण केले. तालुक्यात ३० जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जळकोट तालुक्यात सुमारे ७३ हजार मतदार होते, त्यासाठी ८७ केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त करण्यात आले होते. एसआयआर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार राजेश लांडगे, गटविकास अधिकारी ऐश्वर्या चितारी, नायब तहसीलदार रंगनाथ कराड, सहाय्यक गटविकास अधिकारी रोहित देडगे, मुख्याधिकारी रोहित आरबोळे, मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील, गटशिक्षणाधिकारी रश्मिता साहू यांनी वेळोवेळी आढावा घेतला. बीएलओ पर्यवेक्षक एस. बी. तिडके, सचिन काडवादे, एम. एस. पाटील, एम. व्ही. हंगरगे, के. पी. बिरादार, बालाजी काटे आणि व्यंकट आंदे, सुधाकर बुक्के यांनी बीएलओंच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवले. तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे अलीम शेख, आर. पी शेख तसेच इतर कर्मचाऱ्यांनीही बीएलओंच्या अडचणी तातडीने सोडवत संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडली होती. त्यामुळे जळकोट तालुक्यातील सर्वच बीएलओंनी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सर्वच बीएलओंनी १०० टक्के काम पूर्ण केले असून. त्यामुळे तालुक्यातील एसआयआर कार्यक्रम राज्यातील आदर्श एक ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande