नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; ऑनलाईन अर्जाचे आवाहन
नंदुरबार, ६ ऑगस्ट (हिं.स.) : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहाय्यक संचालक, नंदुरबार कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलांचे एक आणि मुलींचे एक अशा एकूण दोन शासकीय वसतीगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया
नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; ऑनलाईन अर्जाचे आवाहन


नंदुरबार, ६ ऑगस्ट (हिं.स.) : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहाय्यक संचालक, नंदुरबार कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलांचे एक आणि मुलींचे एक अशा एकूण दोन शासकीय वसतीगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये बारावीनंतर उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक व अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ, दिव्यांग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

0000000000000000000

पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर दि. ७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अर्ज सादर करावयाचे आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतीगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक संचालक कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (शैक्षणिक वर्ष २०२६-२७)

ऑनलाइन अर्ज भरण्याचा कालावधी: ७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६

अर्जांची छाननी: १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२६

पहिली गुणवत्ता निवड यादी प्रसिद्ध: ८ सप्टेंबर २०२६

पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत: १८ सप्टेंबर २०२६

रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील दुसरी निवड यादी: २१ सप्टेंबर २०२६

दुसऱ्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत: ३० सप्टेंबर २०२६

जिल्ह्यातील पात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून शासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतीगृह तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असेही सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी कळविले आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande