अनधिकृत पोस्टरबाजीवर लातूर महापालिकेची कारवाई; पाच संस्थांवर मालमत्ता विद्रुपीकरणाचा गुन्हा
लातूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत पोस्टरबाजी विरोधात कठोर कारवाई करत मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यान्वये पाच संस्थांवर गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या बी झोन हद्दीत तपासणी मोहीम राबविण्यात आली.
अनधिकृत पोस्टरबाजीवर लातूर महापालिकेची कारवाई; पाच संस्थांवर मालमत्ता विद्रुपीकरणाचा गुन्हा


लातूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत पोस्टरबाजी विरोधात कठोर कारवाई करत मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यान्वये पाच संस्थांवर गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेच्या बी झोन हद्दीत तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते औसा रोड डिव्हायडर परिसरात सुमारे १० ते १५ ठिकाणी अनधिकृत पोस्टर व स्टिकर्स लावण्यात आल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित पाच संस्थांविरोधात मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच अनधिकृत पोस्टर व स्टिकर्स तातडीने हटविण्यात आले.

महापालिकेने नागरिक, संस्था व संघटनांना सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय पोस्टर, बॅनर किंवा स्टिकर्स लावू नयेत, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande