
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। रांजणगाव (खुरी), ता. पैठण येथील एका कार्यक्रमात आमदार विलास भुमरे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या जाहीर सत्काराबद्दल आभार मानले. तसेच तीर्थक्षेत्र यात्रेचा शुभारंभ देखील संपन्न झाला. याबरोबरच म खासदार संदीपान पाटील भुमरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर व सुरू असलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच अनेक महत्त्वाकांक्षी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
लोकार्पण झालेली प्रमुख विकासकामे :
• आरोग्यवर्धिनी उपकेंद्र (₹५० लाख)
• मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत रांजणगाव–दर्गा–गाडेगाव रस्ता
• श्री स्वामी समर्थ सभागृह
• सती माता सभागृह
• व्यायामशाळा
• छत्रपती संभाजी विद्यालय ते लघाने वस्ती मार्ग
• शेंदूरवाडा MIDC ते प्रधानमंत्री ग्राम सडक मार्ग
• म्हारोळा ते ईनामे वस्ती रस्ता
• जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लेंडी नदीवरील ९ सिमेंट बंधारे
• दर्गा–हनुमान मंदिर–खाम नदी सिमेंट रस्ता
भूमिपूजन करण्यात आलेली प्रमुख कामे :
• रांजणगाव (खुरी) ते पैठणखेडा रस्ता
• रांजणी ते शेकटा रस्ता
• मुख्यमंत्री सौर किसान वाहिनी प्रकल्प
• म्हारोळा ते रांजणगाव (खुरी) रस्ता
• गणपती मंदिर सभागृह
• रांजणगाव (खुरी) ते बिडकीन सिमेंट रस्ता
• बुरंगुळी नदीवरील पूल
• भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेचा विकास
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis