
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या उद्योयग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य लघु उद्यो ग विकास महामंडळ व RAMP (Raising and Accelerating MSME Performance) कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्पादन (Manufacturing) क्षेत्रातील सूक्ष्म व लघु उद्योMगांना चालना देण्यासाठी फॅक्टरी भाडे अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील उद्यम (Udyam) नोंदणीकृत उत्पादन क्षेत्रातील पात्र सूक्ष्म व लघु उद्योतगांना (MSES) कारखान्याच्या मासिक भाड्याच्या 30 टक्के किंवा कमाल ₹30 हजार प्रतिमहिना इतके आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये : कारखान्याच्या भाड्यावर 30% पर्यंत अनुदान. कमाल ₹30 हजार प्रतिमहिना आर्थिक सहाय्य. नव्या उद्यो गांना उत्पादन व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन.उद्यो गांच्या उत्पादन क्षमतेत वाढ.रोजगार निर्मितीस चालना.5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीपासून कार्यरत उत्पादन उद्यो गांना प्राधान्य.
पात्रता
नोंदणीकृत भाडे करारनामा, ऑनलाइन सुविधा द्वारे भाडे अदा पावतीअर्ज करण्याची अंतिम तारीखः 31 ऑगस्ट 2026,ऑनलाईन अर्ज: mssidc.maharashtra.gov.in/RAMP/#/EOI अधिक माहितीसाठी संपर्कः BFC Manager: अनिकेत शिवाजीराव डाके 9699637821,
Technology Manager: अनुज विजयकुमार ढवळे 9359747011, Field Officer: विशाल मधुकरराव इंगळे – 7972790530 जिल्हा उद्यो ग केंद्र जालना अंतर्गत कार्यरत बिझनेस फॅसिलिटेशन सेल/टीम यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यातील पात्र सूक्ष्म व लघु उत्पादन उद्योरगांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करून शासनाच्या भाडे अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis